पुण्याच्या आंबेगावमध्ये 3 मुलं घोडनदीत बुडाली

पुणे  : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घोडनदीमध्ये तीन मुलं बुडाली आहेत. या तिन्ही मुलांचा सध्या शोध घेतला जात असून या ठिकाणी ते सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते. वैभव वाव्हळ (वय 16), श्रेयस  वाव्हळ (वय 15) आणि प्रणय  वाव्हळ (वय 15) अशी या तिन्ही मुलांची नवे असून ते शिंगवे गावातील आहेत.

सध्या स्थानिक पातळीवर त्यांचा शोध घेतला जात आहे. काल याठिकाणी ते सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते, मात्र संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. सगळीकडे तपास करून झाला असता नदीकिनारी त्यांच्या चपला कपडे आणि मोबाईल आढळून आले. त्यामुळे ते तिघेजण वाहून गेल्याचा अंदाज बांधण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेतला. मात्र त्यामध्ये यश आले नाही. दरम्यान, सध्या एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले असून या मुलांचा शोध घेतला जात आहे.

Visit : Policenama.com