#IPL2019 : मुंबई व चेन्नईमधील चकित करणारा फायनलचा अजब योगायोग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलच्या १२ व्या मोसमातील आजचा शेवटचा सामान्याला अवघे दोन तास बाकी आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघामध्ये हा सामना आज रंगणार आहे. हे दोन्ही संघ चौथ्यांदा फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी यापूर्वी तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. या दोन्ही संघामध्ये चकित करणारे काही अजब योगायोग आहेत.

पहिला योगायोग
या दोन्ही संघामध्ये आत्तापर्यंत तीन वेळा फायनलमध्ये समाने झाले आहे. तिन्ही वेळेस ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली त्या संघाचा विजय झाला आहे. २०१० च्या फायनलमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांना आमनेसामने आले. त्यावेळी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा २२ धावांनी पराभव केला. तर २०१३ च्या फायनलमध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईचा २३ धावांनी पराभव केला. २०१५ मध्ये पुन्हा एकदा मुंबईने चेन्नईवर ४१ धावांनी मात करत विजय मिळवला. तसेच २०१७ च्या फायनलमध्ये मुंबईने पुणे संघाचा अवघ्या १ धावेने पराभव केला. त्यामुळे आजच्या सामन्यात जो संघ टॉस जिंकेल तो प्रथम फलंदाजी करण्याची शक्यता आहे.

दुसरा योगायोग
चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज करण शर्मा जेव्हा अंतिम सामन्यात खेळतो त्यावेळी चेन्नई विजयी होते. करण शर्माने २०१६ मध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून खेळताना अंतिम सामना खेळला आणि त्या संघाने विजय मिळवला होता. २०१७ मध्ये करण शर्मा मुंबईकडून खेळला आणि मुंबई चॅम्पियन झाली. २०१८ मध्ये करण शर्मा चेन्नईच्या संघातून खेळला आणि चेन्नई चॅम्पियन झाली. त्यामुळे करण शर्मा ज्या संघाकडून खेळतो त्या संघाने फायनलमध्ये विजय प्राप्त केला आहे. आजच्या सामन्यात करण शर्मा पुन्हा एकदा चेन्नई कडून खेळत आहे. त्यामुळे चेन्नई या फायनलमध्ये चॅम्पियन होते का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

तिसरा योगायोग
अंकशास्त्रानुसार मुंबई यंदाच्या मोसमात चॅम्पियन होईल असा मजबूत दावा करण्यात येत आहे. कारण मुंबईने यापूर्वी २०१३, २०१५ आणि २०१७ या विषम वर्षाला आयपीएल चषक जिंकला आहे. २०१३ पासून एक वर्ष सोडून मुंबई विजयी झाली आहे. त्यामुळे यंदा म्हणजेच २०१९ च्या मोसमात मुंबईला विजयाची संधी आहे.