राजधानी दिल्लीत ‘कोरोना’चे 3 संशयित हॉस्पिटलमध्ये दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकासह एक डझनहून अधिक देश कोरोनाच्या विषाणुचा संसर्ग झाला आहे. भारतातही राजधानी दिल्लीत तीन संशयित आढळले असून त्यांना राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे सॅम्पल नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल ला पाठविण्यात आले आहे.

जयपूरमध्ये कोरोना विषाणुचा संशयित रविवारी आढळून आला होता. जयपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला पिडित तरुण चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. भारतात परत आल्यानंतर त्याच्यामध्ये कोरोना विषाणुची लक्षण दिसू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

चीन मध्ये कोरोना विषाणुने आतापर्यंत 106 जणांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येते. श्रीलंकेत सोमवारी एक 40 वर्षाची महिला कोरोना विषाणुची शिकार झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर श्रीलंकेने चीनी नागरिकांना व्हिसा देण्याचे थांबविण्यात आले आहे.