पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; तीन जण गंभीर जखमी

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड मधील नेहरूनगर येथे एका घरात गॅस सिलेंडरची गळती झालेल्या स्फोटात ३ जण गंभीर जखमी असून दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. ही घटना वसंत दादा पाटील विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या घरात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या नेहरूनगर येथे एका भाड्याच्या घरात सिलेंडर गॅसची गळती होऊन स्फोट झाला.यात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत.

यात सुरेंद्र सिंग,संंदीप सिंग आणि दुर्गेश सिंग हे गंभीर जखमी झाले आहेत.तर पत्नी अनिता सिंग,शिवा दुर्गे हे किरकोळ जखमी झाले आहेत.गुरुवारी रात्री सर्व सर्वजण जेवण करून झोपले होते.शुक्रवारी सकाळी झोपेतून उठल्यावर घरातील एकाने विजेचे बटण दाबल्यावर अचानक मोठा स्फोट झाला.स्फोट एवढा भीषण होता की घरातील सर्व सामान अस्तव्यस्थ झाले असून घराचे पत्रे देखील उडाले आहेत.अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरातील नागरिक घाबरले होते,स्फोटाचा आवाज दूर पर्यंत गेला होता.जखमींना भोसरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.