3-D प्रिंटिंगव्दारे बोलू लागली ‘मिस्त्र’ची 3000 वर्षापुर्वीची ‘ममी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॉस्कोच्या कुर्चतोव इंस्टीट्यूट मधील शास्त्रज्ञांनी आश्चर्यकारक संशोधन केले आहे. संशोधकांनी थ्री-डी प्रिंटिंगच्या माध्यमातून तीनहजार वर्ष जुन्या असलेल्या ममीला आवाज दिला आहे. या पद्धतीने प्राचीन मनुष्याचे आवाज ऐकले जाऊ शकतात असे म्हंटले जाते. मिस्रचे पिरॅमिड नेहमीच जगासाठी मोठे आश्चर्य राहिलेले आहे.

या शोधाने जगाला चकित केले आहे. लंडन विद्यापीठातील वैज्ञानिक, संशोधकांमध्ये असा विश्वास आहे की इजिप्तची नेसामुन मम्मी इ.स.पू.1099 पासून 1069 पर्यंत फेराओ रामसेसच्या राजकारणातील अस्थिर शासनव्यवस्थेतील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नेसयामुन मिस्र हे विश्व धरोहर स्थळ थेब्सच्या मंदिरातील पुरोहित किंवा मुंशी म्हणून काम करत होते. त्याच्या आवाजाला नेसामुनने केलेल्या विधींमध्ये विशेष महत्त्व होते. वैज्ञानिकांनी नेश्यामुनच्या तोंड आणि घशांचे सखोल विश्लेषण करण्यासाठी संगणकीय टोमोग्राफी स्कॅन नावाच्या एक्स-रे यंत्राचा उपयोग केला.

यानंतर थ्री-डी प्रिंटिंगचा वापर करून मामीच्या स्वरयंत्राला पुन्हा बनवण्यात आले. अभ्यासामध्ये सांगण्यात आले आहे की, जेव्हा संशोधकांनी स्वर यंत्राचा वापर  थ्री-डी प्रिंटिंगच्या साहाय्याने केला की त्यामुळे ते एकाच आवाज वारंवार काढू शकत होते.

फेसबुक पेज लाईक करा –