three dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमध्ये आढळले 3 मृतदेह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात आज सकाळी तीन मृतदेह (three dead body in pune) आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली असून, वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमधून हे तीन मृतदेह (three dead body) बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढून ससून रुग्णालयात शवविच्छेदन (sassoon hospital postmortem) करण्यासाठी पाठविले आहेत. तीनही मृतदेह अनोळखी असून, त्यांची ओळख पटवली जात आहे. याप्रकरणी हडपसर (Hadapsar police station), दत्तवाडी (dattawadi police station) आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात ((sinhagad road station) याची नोंद करण्यात आली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

मिळालेल्या माहितीनुसार, शहरालगत वॉटर बॅक कॅनॉल आहे. दुथडी भरून हा कॅनॉल वाहत आहे. दरम्यान, हडपसर येथे रात्री उशिरा शिंदे वस्ती परिसरात असलेल्या कॅनॉलमध्ये मृतदेह तंरगत असल्याची माहिती अग्निशमन दल व पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस व जवानांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. 35 ते 40 अंदाजे वय असल्याची माहिती देण्यात आली आहे. हडपसर पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्यात येत असल्याची माहिती आहे.

Builder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या ‘या’ सवलतीचा लाभ घेऊन घेतला तब्बल 103 कोटींचा फ्लॅट

तर जनता वसाहती येथील कॅनोलमध्ये देखील एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे.
आज सकाळी ही माहिती मिळताच अग्निशमन दल व अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे धाव घेऊन तो मृतदेह बाहेर काढला आहे.
त्याची ओळख पटलेली नाही. तीन ते चार दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असण्याची शक्यता आहे.
आता दत्तवाडी पोलीस त्याची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.

सिंहगड रोड भागातील वडगाव कॅनोलला एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
त्याचीही ओळख पटली नसून त्याबाबत सिंहगड रोड पोलिस तपास करत आहेत.
सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांनी धाव घेतली आहे.

दरम्यान, कॅनॉलमध्ये मृतदेह आढळले जात असताना या कॅनॉलमध्ये अनेकजण पोहत असताना दिसतात.
त्याकडे सरास दुर्लक्ष केले जाते. लहान मूल देखील पोहताना दिसतात. त्यामुळे बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात.
दरम्यान अनेकवेळा ग्रामीण भागातून मृतदेह वाहत येतात. त्यानुसार पुणे पोलीस ग्रामीण पोलिसांच्या मदतीने याचा तपास करतात.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : three dead body in pune 3 bodies found in canals in different parts of Pune

हे देखील वाचा

Spa Center in pimpri chinchwad | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, एकाला अटक

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना