आष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – आष्टा तासगाव रोडवरील चांदोली वसाहतीजवळ गॅस वाहतूक करणारा ट्रक व मोटरसायकल यांची धडक होऊन या अपघातात मोटरसायकलवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे. बावची येथील सुमित पाटील अनिकेत माळी, प्रवीण सूर्यवंशी हे तीन युवक तासगाव रोड वरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. तेथून जेवण करून रात्री १२ च्या सुमारस दुचाकीवरून बावचीकडे निघाले होते. तर कोल्हापूर वरून गॅस वाहतूक करणारा ट्रक हा भिलवडी स्टेशनकडे निघाला होता.

दोन्ही वाहने महावितरण कार्यालयासमोर आली असता त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भयानक होते की प्रविण सुर्यवंशी व अनिकेत माळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमित हा रस्त्याच्याकडेला पडलेला होता. त्याला उपचारासाठी सांगली येथे दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सुमित पाटील व प्रविण सुर्यवंशी यांचे एम. बी. ए पर्यत शिक्षण पुर्ण झाले आहे. तर अनिकेत माळी यांने इंजिनिअरिंग शिक्षण पुर्ण केले आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांमध्ये तिघे जण वाढदिवसाच्या साजरा करण्यासाठी गेले असल्याची चर्चा होती. तर बावची गावातील तिन्ही युवकांचा अपघात झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like