ट्रक आणि जीपचा भीषण अपघात ; ३ जण ठार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर मुंबई महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेत मृत झालेले तिघेही मुंब्र्यातील केटरिंग कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.

आमीर खान (वय ३६), इरशाद खान (वय ३२), हारून खान (वय ३५) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

अमरावती येथून मुंब्र्यातील केटरिंग करणारे सात जण झायलो गाडीतून मुंबईकडे जात होते. त्यावेळी औरंगाबादजवळ शिवराई गावाजवळ आल्यावर समोरून येणाऱ्या एका ट्रकला समोरासमोर झायलोची धडक झाली. जीप चालक खड्डे चुकवत असताना हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात जीपमधील २ जण जागीच ठार झाले. तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर इतर ४ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading...
You might also like