Coronavirus : ‘कोरोना’मुळं आणखी तिघांचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा 8 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि राज्यात देखील कोरोनामुळं अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यानं महापालिका प्रशासनानं शहरातील काही परिसर सील देखील केला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 9 ते 11 वाजण्याच्या दरम्यान कोरोनामुळं तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तिघांचेही वय हे 60 च्या पुढं असल्याचं सांगितलं जातं आहे. मृत्यू झालेल्या दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता.


कोरोनामुळं आज (मंगळवारी) तिघांचा मृत्यू झाल्यानं पुणे शहरात कोरोनामळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 8 वर जाऊन पोहचली आहे. शहरातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर पडू नका परिवाराची काळजी घ्या असं आवाहन वेळोवेळी केलं आहे. तरी देखील काही नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले असून पुणे पोलिसांनी त्यांची वाहने देखील जप्त केली आहेत. मंगळवारी कोरोनामुळं पुण्यात तिघांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दुजोरा दिला आहे. पुण्यात मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 8 वर जाऊन पोहचली आहे.