भीषण अपघातात तिघांचा मृत्य ; पुणे जिल्ह्यातील दोघांचा समावेश

पुणे-नाशिक महामार्गावरील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीहून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज नाशिक -पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात हा भीषण अपघात झाला. मयतातील दोघे पुणे जिल्ह्यातील आहेत, तर एक नगरचा आहे.

सय्यद शौकत सय्यद (वय 20, रा. हसनापूर, ता. राहाता. जि. नगर ), सुनील अंकुश खरात (वय 25, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जिल्हा. पुणे), किरण शिवाजी शिंदे (वय 25, रा. डिंबे, ता. आंबेगाव, जिल्हा. पुणे) ही मयतांची नावे आहेत. या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरातील कुटीर रूग्णालयात नेण्यात आले आहेत.

नगर-नाशिक महामार्गावरील घारगाव शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. यात तिघेही जखमी झाले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like