लातूर जिल्ह्यातील लामजनाच्या भाविकांवर मध्य प्रदेशात काळाचा घाला, तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशात भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी आणि मृत झालेले व्यक्ती हे लातूरमधील औसा तालुक्यातील असून देवदर्शनाला जात असताना हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील लामजना येथील लाडखाँ परिवार हा अजमेर येथे देवदर्शनावरून परत येत असताना त्यांच्या गाडीला मध्यप्रदेशातील रतलाम शहराजवळ अपघात झाला. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव जीप आदळून हा अपघात झाला. काल संध्याकाळी सहा वाजता हा अपघात घडला असून जखमींना उपचारासाठी दवाखाण्यात दाखल करण्यात आले.

(एमएच 25 आर 0854) या वाहन क्रमांक असलेल्या जीपने हे सर्व जण अजमेरवरून परतत असताना त्यांची गाडी रतलाम शहराजनिक असलेल्या टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक (एचआर 65 ए-9370) वर जोरात आदळली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले.

अपघातातील मृतांची नावे

1) सलिम अब्दुल लाडखाँ (वय 52)
2)अलिशा शफीक लाडखाँ (वय 30)
3)रहिम सालार मुल्ला (वय 35)

अपघातातील जखमींची नावे

1) शफीक सलिम लाडखाँ (वय 35)
2)जन्नतबी सलिम लाडखाँ (वय 50)
3)अल्फिया शफीक लाडखाँ (वय 8)
4)अर्शद शफीक लाडखाँ (वय 5)
5)अहिल शफीक लाडखाँ (वय दीड वर्ष)
6)चालक नूरमहमंद शेख (वय 30)

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like