दुर्दैवी ! ‘कोरोना’च्या भीतीमुळे दुचाकीवर गावी जाणार्‍या पती-पत्नीचा 4 वर्षाच्या मुलासह मृत्यू, वाईजवळ भीषण अपघात

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या भीतीमुळे  डोंबिवलीतील मोठागाव परिसरातून दुचाकीवर सातार्‍याकडे जाणार्‍या कुटूंबाल वाईजवळा टृकचालकाने दिलेल्या धडकेत  एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. सर्जेराव पाटील, पत्नी पूनम पाटील आणि 4 वर्षांचा मुलगा अभय पाटील अशी मृतांची नावे आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे सर्जेराव पाटील हे पत्नी आणि मुलाला घेऊन दुचाकीवर  सातार्‍याकडे निघाले होते. ते वाईजवळ पोहोचले असता एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असाताना तिघांचाही मृत्यू झाला. सर्जेराव पाटील हे मुंबई डोंबिवली येथे राहण्यास होते.  या अपघाताने डोंबिवलीमधील मोठागाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती स्थानिक नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

You might also like