खळबळजनक ! दूरदर्शन मधील १० महिलांनी केला लैंगिक छळाचा आरोप 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दूरदर्शन या देशातील सर्वात मोठ्या सरकारी टी व्ही नेटवर्किंग संस्थेतील दहा महिलांनी आपले लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला आहे. या संदर्भातील वृत्त ‘पीटीआय’ संस्थेने दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर दहा पैकी नऊ प्रकरणात संस्थेअंतर्गत लैंगिक तक्रार निवारण समितीने न्याय केला नाही अशी खळबळ जनक माहिती पीडित महिलांच्या वकील वरुणा भंडारी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाचे प्रकार एका मागून एक उघडे पडण्याची देशात खळबळ सुरु झाली असून या सर्व प्रकारात बाऱ्याच बड्या लोकांची नावे समोर आली आहेत. या अगोदर तनुश्री दत्ता यांनी सर्वप्रथम या संदर्भात आवाज उठवला असून त्यानंतर देशातील अनेक बड्या लोकांना आपली पदे गमावली आहे. दूरदर्शन मधील महिलांनी यांचे अनुभव माध्यमांच्या प्रतिनिधी समोर सादर केले आहेत त्यात त्यांनी म्हणले आहे कि, आम्ही आमचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार लैंगिक शोषण विरोधी समितीला केली परंतु त्यानंतर त्या समितीने घटनेची चौकशी करून  निपक्ष अहवाल वरिष्ठांपुढे मांडला परंतु त्यांनी कसलीच दखल घेतली नाही असे या महिलांनी म्हणले आहे. तर लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांनी आम्हाला धमकावले असून आमच्या जीवाला धोका असल्याचे हि म्हणले आहे.

२०१५ साली झालेल्या या लैंगिक शोषणाबद्दल समितीने निलंबनाचे आदेश देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले नाही असे त्या पीडित महिलेने म्हणले आहे तर मी तक्रार केली म्हणून त्या अधिकाऱ्याने मला आज पर्यंत असाह्य मानसिक त्रास दिला आहे असे ती पीडित महिला म्हणाली आहे. त्या पीडित महिलांपैकी एक महिला डीडी भोपाळमधील आहे असे वकील  वरुणा भंडारी यांनी सांगितले आहे.

लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिलांपैकी तीन महिला या करार पध्द्तीने दूरदर्शन मध्ये कामावर आहेत. त्यांनी छळाबाबत अधिक माहिती दिली नाही. त्यापैकी एका महिलेला तर तक्रार केली म्हणून ७ महिन्यापासून पगार देण्यात आलेली नाही. महिलांच्या बाबतीतले एवढे मोठे प्रकरण उघडकीस आल्याने आता या संदर्भात पावले उचलली जाण्याची आवश्यकता आहे.