सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने आत ‘हा’ ३ फुट्या डॉक्टर बनणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर कोणामध्ये काही टॅलेंट असेल तर त्याला कोणीही अडवू शकत नाही. असंच काहीसं १७ वर्षांच्या अपंग गणेशने करून दाखवलं आहे. गणेशने NEET परिक्षेत २२३ गुण मिळवले आहेत. पंरतू गणेशला मेडिकल कॉलेजमध्ये दाखला दिला गेला नाही. त्यासाठी त्यांना कारण देण्यात आले ते त्यांच्या उंचीचे. गणेश हा १७ वर्षांचा असून त्याची उंची ३ फूट आहे आणि वजन १४ किलोग्राम आहे.

गणेशचे वय, उंची वजन पाहून त्याला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला होता. परंतू गणेशने हार मानली नाही. त्याने न्यायालयात दाद मागितली. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मेडिकल कॉलेजमध्ये दाखला देण्यासाठी आदेश दिले आहेत.

गुजरातच्या भावनगर येथे राहणारा गणेश डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे स्वप्न पाहत होता. परंतू चांगले गुण मिळवुनही त्याच्या अपंगत्वावर प्रश्न घेत त्याला दाखला नाकारण्यात आला होता. यावर सुप्रीम कोर्टाने फक्त उंचीचे कारण देऊन गणेशला त्याचे करिअर बनवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे त्याला मेडिकल कॉलेजमध्ये दाखला मिळाला पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गणेश ने या प्रकरणी पहिल्यांदा उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तेथे त्याच्या पदरात निराशा पडली. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. तेव्हा सर्वोच्च न्यायलयाने गणेशची बाजू घेत त्याच्या हिताचा निर्णय घेतला.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like