श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमधील कर्मचार्‍यासह तिघे गेले वाहून, मृतदेह आढळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी पुण्यामध्ये ढगफुटीसदृष झालेल्या मुसळधार पावसाने 17 जणांचा बळी घेतला. कात्रज येथील तिन मित्र पार्टी करून परत येत असताना ते तिघे गाडीसकट पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे. हे तिघे मित्र काळेवाडी परिसरामध्ये वॅगनार कारमधून पार्टी करण्यासाठी गेले होते. मात्र, ते तिघेही वाहून गेले असून त्यांची कार आणि मोबाइल काळेवाडी परिसरातील सापडला आहे. सुरज वाडकर, निखील चव्हाण आणि गणेश शिंदे असे बेपत्ता असलेल्या तरुणांची नावे आहेत. सुरज वाडकर हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमध्ये कामाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात राहणारे तिघे मित्र पार्टीसाठी पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथील हॉटेलमध्ये गेले होते. पार्टी संपल्यानंतर परत येताना तिघेही वॅगनार या गाडीसह ते वाहून गले. काळेवाडी परिसरातील एका नाल्यातील एका झाडाला गाडी अडकलेली सापडली. आज (शुक्रवार) नाल्यापासून काही अंतरावर एकाचा मृतदेह सापडला असून हा मृतदेह सुरज वाडकर याचा आहे.

बुधवारी रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास पाऊस सुरू झाला. शहराच्या सर्वच भागांत पावसाचा जोर असला, तरी कात्रज, आंबेगाव, बिबवेवाडी, सहकारनगर, सिंहगड रस्ता या ठिकाणी त्याचा जोर अधिक होता. त्यामुळे या भागातील ओढ्या-नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. पाण्याला प्रचंड वेग असल्याने आजूबाजूच्या वस्त्या आणि सोसायट्यांच्या भिंती फोडून पाणी घरांत आणि वस्त्यांमध्ये शिरले. अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीत भिंत पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like