Pune : वडकीतील तीन गोडाऊन जळून खाक ! जीवित हानी टळली, कोट्यवधीचे नुकसान

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. सासवड रस्त्यावरील वडकी (दत्तनगर, ता. हवेली) येथील वेलोसिटी सप्लाय चेन या गोडाऊनला रात्री 10. 30 वाजताचे सुमारास आग लागली आहे. गोडाऊनमध्ये आदणी, ग्रेट वाईट, पेपर बोट, इपका ल्याबोरेटरीज लिमिटेड, आमवे या कंपनीचा मोठ्या प्रमाणावर माल होता. आगीचे वृत्त समजताच पीएमआरडीएच्या पाच आणि पालिकेच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रविवारी (दि. 16 मे) दुपारी बाराच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले.

शनिवारी (दि. १५) रात्री उशिरा तेलाच्या गोदामाला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर सुरवातीला तीन अग्निशमन दलाच्या गाड्या वडकी येथील घटनास्थळी पोहचल्या. सुरवातीला तेलाच्या गोदामातील आग इतरत्र पसरू नये म्हणून फोमद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग काही केल्या नियंत्रणात येत नव्हती. जवान फोमबरोबरच पाण्याचा माराही आगीवर सुरु होता. पीएमआरडीएच्या ५ अग्निशमन गाड्या दोन पालिकेच्या अग्निशमन गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर याच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू होते. ५० हून अधिक जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करीत होते. या गोदामात ५०० ते ६०० टन खाद्यतेलाचा साठा असल्याचा अंदाज पीएमआरडीएचे अग्निशमन अधिकारी विजय महाजन यांनी सांगितले. गोडावूनला लागूनच वायरींचे गोदाम होते. त्या ठिकाणीही तेल काही अंशी प्रवाहित झाल्याने. त्या गोदामामने पेट घेतला. तेलाचे आणि वायरींचे शेड यावेळी जमीनदोस्त झाली. या दोन गोदामावरील आगीवर नियंत्रण मिळवत असताना तोच जवळच असलेल्या वैद्यकीय साहित्याच्या गोदामाला आणि त्या बरोबर आणखी एका गोदामाला आग लागून गोदामे खाक झाली. रविवारी (16 मे) दुपारपर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते, असे त्यांनी सांगितले.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार “आग अद्यापही सुरु आहे. रात्री वारे मोठ्या प्रमाणात असल्याने आग इतरत्र पसरली. त्यातच खाद्यतेलाला आग असल्याने ती जास्तच पसरल्याचे निदर्शनास आले. येथील चारची गोदामे जाळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत जीवित हानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पाणी मारल्यानंतर आग अधिकच पसरत आहे. तेलाचे गोदाम, औषधे व वैद्यकीय साहित्य असलेले गोदाम यावेळी जळून खाक झाली, असे त्यांनी सांगितले.