प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या, जमावानं मारहाण करून दोघांना केलं ठार

गुमला : वृत्त संस्था – झारखंडच्या गुमलामध्ये पतीच्या हत्येचा आरोप करत जमावाने एक महिला आणि तिच्या कथित प्रियकराला जबर मारहाण केली. घटनेबाबत पोलिसांनी म्हटले की, प्रियकराच्या मदतीने कथितप्रकारे आपल्या पतीची हत्या केल्यानंतर एका महिलेसह तीन लोकांना जमावाने बेदम मारहाण करत ठार केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील डेंगडीह गावात राहणार्‍या मारियानस कुजूर याची पत्नी नीलम कुजूर आणि तिचा प्रियकर सुदीप डुंडुंग यांनी हत्या केली. नोन्गा येथे राहाणारा सुदीप सोमवारी आपल्या मित्र पाकी कुल्लूच्या सोबत नीलमला भेटण्यासाठी डेंगाडीह गावात आला होता.

गावातच प्रियकर सुदीपने आपल्या प्रेयसीच्या पतीच्या खुनाचा कट रचला आणि त्याला रात्री ठार केले. यादरम्यान, ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच तिघांना फसवूण जमावामध्ये आणण्यात आले.

येथे एका ग्रामस्थाने म्हटले की, हे संपूर्ण गावासाठी अपमानकारक आहे की, एक विवाहित महिला विवाहबाह्य संबंध ठेवत होती आणि तिने आपल्या पतीची हत्या केली. यानंतर ग्रामस्थांनी तिघांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

जमावाने त्यांना असे मारले की, मंगळवारी सकाळी तिघांचाही मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि चौघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. लिंचिंगमध्ये सहभागी लोकांना अटक करण्यासाठी एक ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.