दुर्मिळ खवले मांजराच्या विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – दुर्मिळ खवले मांजराची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना चंदननगर पोलिसांनी शनिवारी पकडले. त्यांच्या ताब्यातून एक खवले मांजर हस्तगत करण्यात आले असून ते कात्रज येथील प्राणी संग्रहालयाकडे सोपविण्यात आले आहे. योगेश यशवंत पाते (वय ३०, रा. दिवे आगर गाव, ता़ श्रीवर्धन, जि़रायगड), जितेंद्र शिवराम मोहित (वय ३२, रा. गाव आरावी, ता. श्रीवर्धन, जि़. रायगड), कुमारेश्वर यशवंत सावंत (वय ४६, रा. चिंचवाड गाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

चंदननगर पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस नाईक तुषार आल्हाट यांना तिघे जण खवले मांजर विक्रीसाठी आणणार आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी खराडी बायपास रोडवरील हॉटेल प्राईड येथे सापळा लावला. मिळालेल्या माहितीतील वर्णनानुसार तिघे जण तिथे आले. पोलिसांनी त्यांना पकडले़ त्यांच्याकडे एक मोठी बॅग होती.

बॅगेची तपासणी केल्यावर त्यात एक जिवंत खवले मांजर आढळून आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ते विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. खवले मांजर हे दुर्मिळ समजले जाते. पोलिसांनी त्याच्या पुढील पालनपोषणासाठी कात्रज येथील प्राणी संग्रहालयाकडे सोपविले आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like