पुढील वर्षी स्पेस स्टेशनवर जातील 3 खासगी प्रवासी, प्रत्येकाने दिले 400 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पृथ्वीपासून सुमारे 420 किलोमीटर वर अंतराळात अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आहे. येथे जाण्याची इच्छा अनेक लोकांना असते. तुम्ही सुद्धा जाऊ शकता, पण तुमच्याकडे 400 कोटी रुपये असायला हवेत. सध्या पृथ्वीवरून तीन अरबपती लोक स्पेस स्टेशनला जाण्याची तयारी करत आहेत. यासाठी प्रत्येक अरबपतीला 400 कोटी पेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. हे श्रीमंत लोक कोण आहेत? ते केव्हा आणि कशाप्रकारे स्पेस स्टेशनचा प्रवास करतील? त्यांना कोणती स्पेस एजन्सी अंतराळात घेऊन जाईल? याबाबत जाणून घेवूयात.

मंगळवार म्हणजे 26 जानेवारीला अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील केप कॅनवरलमध्ये पहिल्या प्रायव्हेट स्पेस स्टेशन क्रुची ओळख करून देण्यात आली. अंतराळात जाणार्‍या या क्रु मध्ये तीन प्रवासी आहेत. यापैकी प्रत्येक प्रवाशाने 55 मिलियन डॉलर्स म्हणजे 400 कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्तच पेमेंट केले आहे. हे लोग स्पेसएक्सच्या रॉकेटने स्पेस स्टेशनसाठी रवाना होतील.

या तीन प्रवाशांची नावे आहेत – ईटन स्टिबे (Eytan Stibbe), मार्क पॅथी (Mark Pathy) आणि लॅरी कॉनर (Larry Connor). हे पुढल्या वर्षी जानेवारीत प्रवासाला निघतील. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाणारे हे पहिले प्रायव्हेट फ्लाइट असेल. या लोकांना घेऊन जाण्याची जबाबदारी माजी नासा अ‍ॅस्ट्रोनॉट मायकल लोपेज अलेग्रिया यांची असेल. मायकल आता ह्यूस्टन येतील एक्सीओम स्पेस नावाच्या कंपनीत काम करतात.

एक्सीओम स्पेसचे चीफ एक्झीक्यूटिव्ह माइक सफ्रेडिनी यांनी सांगितले की, स्पेस स्टेशनचा आतापर्यंत कुणीही खासगी प्रवास केलेला नाही. माइक सफ्रेडिनी अगोदर नासामध्ये स्पेस स्टेशन मॅनेजर होते.

माइक सफ्रेडिनी यांनी सांगितले की, मायकल लोपेज अलेग्रिया स्पेस स्टेशनची फ्लाइट्स आणि स्पेस स्टेशनबाबत जाणकार आहेत. अन्य तीन ते लोक आहेत जे अंतराळातील स्पेस स्टेशनचा प्रवास करण्यास सक्षम आहेत. ते इतका खर्च करू शकतात, म्हणून आम्ही त्यांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर घेऊन जाण्याची संधी देत आहोत.

हे तीन प्रवासी आठ दिवसांपर्यंत स्पेस स्टेशनमध्ये राहतील. त्यांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी एक ते दोन दिवस लागतील. त्यांना स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलने स्पेस स्टेशनपर्यंत पाठवले जाईल आणि परत आणले जाईल. रशिया 2001 पासून लागोपाठ स्पेस स्टेशनसाठी प्रवाशांना पाठवत आहे. काही वर्षानंतर रिचर्ड ब्रॅसननची व्हर्जिन गॅलेक्टिक आणि जेफ बेजोसची ब्लू ओरिजिन सुद्धा कस्टमर्सकडून पैसे घेवून स्पेस स्टेशनचा प्रवास घडवतील. परंतु काही वर्षानंतर इतका खर्च येणार नाही. लोक सीट्सचे पैसे देतील, स्पेस स्टेशनजवळ जाऊन थोडावेळ फिरून परत येतील.