मुलीसाठी कायपण ! ३ महिन्याची प्रेग्नेंट असताना झिंगाट नाचली अभीनेत्री ईशा देओल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री हेमा मालिनी आणि नृत्य यांचं अनोखं नातं आहे. त्यांनी त्यांच्या नृत्य कलेचं बाळकडू आपल्या दोन्ही मुली ईशा आणि आहाना यांना दिलं आहे. आता ईशा देओल देखील हीच परंपरा आपल्या १७ महिन्यांच्या  मुलीला देत आहे याचा प्रत्यय नुकताच एका कार्यक्रमात आला. ईशाने आपली मुलगी राध्या सोबत झिंगाट या गाण्यावर नृत्य केले. विशेष म्हणजे ईशा आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.  यासंदर्भात ईशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊण्टवरून एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती राध्यासोबत डान्स करताना दिसत आहे.राध्याच्या शाळेतील अॅन्युअल डेला आई- मुलीने केलेला हा डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या खास क्षणाबद्दल ईशा देओल म्हणाली की, ‘जेव्हापासून राध्याचा जन्म झालाय तेव्हापासून गाण्याच्या तालावर आपलं शरीर हलवते. जेव्हा राध्या माझ्यासोबत अॅन्युअल डेला नाचली तो क्षण माझ्यासाठी आणि पती भरत तख्तानीसाठी फार खास होता. मला सर्व गोष्टी योग्य हव्या होत्या म्हणून डान्सप्रमाणेच आम्ही कपड्यांची निवड केली.’ ईशा देओल स्वतः ओडिसी डान्सर आहे. पारंपरिक नृत्यात ती आई हेमा मालिनी यांचा वारसा पुढे नेत आहे.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना ईशाने लिहिले की, ‘राध्याने तिच्या आईसोबत पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केले.’ यावेळी ईशा आणि राध्याने मराठमोळी वेशभूषा केली होती. दोघींनी नऊवारी साडी नेसली होती एवढंच नव्हे तर दोघींनी चंद्रकोरही लावली होती. दोघंही या पेहरावात फार सुंदर दिसत होत्या. ईशा आणि राध्याने केसात गजरा माळला होता. या पेहरावात राध्या फारच क्यूट दिसत होती. संपूर्ण कार्यक्रमात राध्यावरची नजर हटत नव्हती.