PMC बँक घोटाळा : ह्दयविकाराच्या झटक्याने 2 खातेदारांच्या मृत्यूनंतर 1 कोटी अडकल्यानं महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेतील (PMC) घोटाळ्यामुळं अनेक खातेदारांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर आरबीआयनं निर्बंध घातल्यानं अनेक खातेदारकांना या घोटाळ्याचा फटका बसला आहे.

पीएमसी बँकेत लाखो रूपये अडकल्यानं तणावामुळे दोन खातेदारांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर आता पीएमसी बँकेच्या खातेदार डॉक्टर योगिता बिजलानी (वय- 39) यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. वर्सोव्यात राहणाऱ्या डॉक्टर योगिता बिजलानी यांचे PMC बँकेत 1 कोटी रुपये अडकले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मंगळवारी बिजलानी यांनी मंगळवारी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन केलं होतं. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या वडिलांनी त्वरित त्यांना रूग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉ. बिजलानी या आपल्या पतीसोबत अमेरिकेत राहत होत्या. सध्या त्या त्या आपल्या आई-वडिलांच्या घरी आल्या होत्या. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपासून त्या मानसिक तणावाखाली होत्या. वर्सोवा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

गृहनिर्माण क्षेत्रातील ‘एचडीआयएल’ समूहाशी निगडित कर्जाच्या घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या ‘पीएमसी बँके’चे ठेवीदार अडचणीत आले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुरूवातीला पैसे काढण्यावर कठोर बंधने आणली होती. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी