मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात ४८ तासात ३ खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – गृह खातं हाती असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात कायदा सुव्यवस्थेचे अगदी धिंडवडे निघाले आहे. गुन्हेगारी टोळ्यांचा वाद, मित्रा मित्रांमधला वाद यातून खून होत आहे. मागील ४८ तासात नागपूरमध्ये एकूण ३ खून झाले आहेत. त्यामुळे शहरात नेमकं चाललंय काय असा प्रश्न पडला आहे.

ह्या आहेत ३ खुनाच्या घटना

बहिणीच्या घरी नेऊन जेवायला सोबत न बसविल्याने खून
बहिणीच्या घरी नेऊनही सोबत जेवायला न बसविल्याने शुभम वासनिक याच्यावर एका तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केला. हा प्रकार लकडगंज पोलीस ठाण्याच्या हददीत घडला असून याप्रकरणी पोलिसांनी शुभमचा खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

दारू पिण्याच्या वादातून खून
पार्डी परिसरातील गृहलक्ष्मी नगर परिसरात घरात घूसून एकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून शनीवारी खून केला. चंदन उर्फ कालू वर्मा याच्यावर अमन गजभिये या तरुणाने तब्बल २१ घाव करून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी अमन गजभिये याला अटक केली आहे.

वर्चस्ववादातून खून
अवैध धंदे चालविणाऱ्या अंकित धकाते याचा भररस्त्यात काल रात्री ९ च्या सुमासार खून कऱण्यात आला. अवैध धंद्यांच्या वादातून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading...
You might also like