‘वंदे भारत’ सुपरफास्ट एक्सप्रेस आता महाराष्ट्रातून देखील धावणार, मुंबई ते दिल्ली फक्त १३ तासात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता महाराष्ट्रातील प्रवासी देखील भारतातील सुपरफास्ट रेल्वेने प्रवास करु शकणार आहे. नवी दिल्लीपासून वाराणसी यामध्ये धावणारी भारतातील सर्वात जलद रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच तीन नव्या शहरांसाठी सुरु होणार आहे. दिल्ली ते जम्मू, दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते हावडा या तीन मार्गावर ही सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्सप्रेससाठी तीन स्थानकांसाठी टाईम टेबल बनवून तयार केले आहे. यामुळे दिल्लीला सुपरफास्ट रेल्वेने प्रवास करु इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

मुंबई ते दिल्ली अंतर फक्त 13 तासात –

रेल्वे मुंबई ते दिल्ली हे अंतर फक्त 13 तासात पुर्ण करणार आहे. या शिवाय ही ट्रेन दिल्ली ते जम्मू हे अंतर फक्त 7 तासात कापेल, तर दिल्ली ते हावडा हे अंतर ही रेल्वे 15 तासात पुर्ण करेल. जम्मू मध्ये या रेल्वेची सुरुवात 2019 मध्ये होणार आहे तर इतर शहरात या रेल्वेच्या सेवेची सुरुवात पुढील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये होणार आहे.

दिल्लीपासून जम्मूपर्यंत जाण्यासाठी अमूमन राजधानी बरोबरच इतर सुपरफास्ट रेल्वेचा प्रवास 10 ते 11 तासांचा असतो त्यामुळे हा प्रवास करणाऱ्या वंदे भारत रेल्वेने हा वेळ 2 ते 3 कमी लागेल आणि ही रेल्वे जम्मूत 7 तासात पोहचेल. ही रेल्वे सकाळी सहा वाजता नवी दिल्लीवरुन धावेल आणि 8.20 वाजता अंबाला आणि 9.45 वाजता लुधियानाला पोहचेल. आणि अखेर 1.30 वाजता जम्मू मध्ये पोहचेल.त्याच दिवशी ही रेल्वे 2.5 वाजता दिल्लीला यायला निघेल. तर रात्री 10.20 मिनिटांनी ही रेल्वे दिल्लीली पोहचेल.

सिने जगत –

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like