सोलापूर येथील वकिल राजेश कांबळे यांचा खून करणारे तिघे ताब्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बेपत्ता झालेल्या अ‍ॅड. राजेश कांबळे यांचा मृतदेह पाडुरंग वस्तीमध्ये आढळून आला होता. कांबळे यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते एका पोत्यात भरुन ठेवलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून सोलापूर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

अ‍ॅड. राजेश कांबळे खूनप्रकरणी संशयित संजय उर्फ बंटी खरटमल याला रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा संजय (बंटी) खरटमल याला सीमावर्ती भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासह आणखी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. अ‍ॅड. राजेश कांबळे हे बेपत्ता असल्याची तक्रार बार असोसिएशनने सोलापूर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?
राजेश कांबळे हे बेपत्ता झाल्याची तक्रार सोलापूर पोलीस आयुक्तांकडे केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. दरम्यान शहरातील पांडुरंग वस्तीतील एका घरातून मागील पाच दिवसांपासून दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी बुधवारी पांडुरंग वस्ती येथील बंद घराचा दरवाजा उघडला असता आतमध्ये मृतदेहाचे तुकडे असलेले पोते पोलिसांना मिळाले. बंद घरामध्ये आढळलेला मृतदेह हा कांबळे यांचा असल्याची माहिती कुटुंबीय आणि पोलिसांनी दिली.
आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय

अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या खून प्रकरणी सोलापूरमधील वकिलांनी आज कामबंद आदोलन केले. तसेच राजेश कांबळे यांच्या खून प्रकरणाती आरोपींचे वकीलपत्र ने घेण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. अ‍ॅड. राजेश कांबळे यांचा मृतदेह बुधवारी पांडुरंग वस्तीमध्ये आढळला होता. या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सिने जगत – 

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !