वेश्याव्यवसाय करुन घेणाऱ्या तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायचा पर्दाफाश करुन परराज्यातील दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली होती. अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेणाऱ्या तीघांना पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायाधीश आर.व्ही. अदोणे यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ea0c3dd-b2b8-11e8-b999-9ba130633105′]

चंदा मुईमांग तमांग (वय 60), संजिदा रूहूल अमीन मुल्ला (वय 25, दोघेही रा. बुधवार पेठ, मुळ रा. पश्‍चिम बंगाल), कुमार शेलवन तमांग (वय 27, रा. काठमांडू नेपाळ) अशी जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार एन. के. तरटे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २६ जून २०१८ व त्यापूर्वी सहा महिन्यांच्या कालावधीत घडली होती.

पोलिसांनी बुधवार पेठेत कारवाई करून आरोपींच्या ताब्यातून कर्नाटक आणि बांग्लादेशातील दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली होती. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी जामीन मिळावा म्हणून तिघांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. आरोपींना जामीन झाल्यास ते फिर्यादी, साक्षीदारांवर दबाव आणून तपासामध्ये ढवळाढवळ करू शकता. तसेच जामीन मिळाल्यास ते पळून जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळावा, असा ऍड. पाठक यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिघांचा जामीन फेटाळला.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

जाहिरात