पवन कल्याणच्या वाढदिवसाचे पोस्टर लावताना 3 चाहत्यांचा मृत्यू, बोनी कपूरने केली प्रत्येकी 2 लाखांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणच्या वाढदिवसनिमित्त आज पवनला शुभेच्छा देण्यासाठी काही चाहत्यांनी ४० फुटाचे एक पोस्टर तयार करण्यात आले होते. मात्र, हे पोस्टर लावत असताना विजेचा झटका बसला आणि तिघांना मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना निर्माता बोनी कपूर यांनी आर्थिक मदत करण्याचे वचन दिलेले आहे.

“आज आम्ही तीन चाहते गमावले आहेत. कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सामील आहोत. या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही चाहत्यांसोबत उभे आहोत. या अपघातात ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करणाक आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो.” अशा आशयाचे ट्विट करुन बोनी कपूर यांनी या घटनेची माहिती दिली.

चितूर जिल्ह्यातील कनमलदोड्डी गावात हा अपघात घडला. पवन कल्याणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या गावात एक भले मोठे पोस्टर उभारले जात होते. ते पोस्टर लावत असताना तिघांना विजेचा झटका बसला. अचानक बसलेल्या झटक्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दूर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना व जखमींना मदत करण्याची जबाबदारी बोनी कपूर यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचे समाज माध्यमांवर कौतुक केले जात आहे.