पुण्यात भरधाव कारच्या धडकेत बाप लेकासह तिघे ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगातील चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाप लेकासह मुलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार एअरपोर्ट रोडवरील आकाशनगर येथे समोर आला आहे. मात्र धडक दिल्यानंतर कारचालक तेथून पसार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सीसीटिव्ही तपासून कारचालकाचा शोध घेतला जात आहे.

नरसय्या येरय्या शेट्टी( वय ३७, रा. कलवड वस्ती लोहगाव), यशवंत नरसय्या शेट्टी (१२, रा. अशपाक सलीम सय्यद (वय १२, रा. कलव़ड वस्ती लोहगाव) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकऱणी अज्ञात वाहनचालकाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसय्या शेट्टी, त्यांचा मुलगा यशवंत आणि शेट्टी यांच्या शेजारी राहणारा अशपाक असे तिघे शेट्टी यांच्या दुचाकीवरून बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जात होते. तेव्हा ते एअरपोर्ट रोडवरील आकाश नगर परिसरात आल्यावर त्यांच्या दुचाकीला एका भरधाव वेगातील कारने जोरदार धडक दिली.

या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले होते. तर कारचालक अपघातानंतर पसार झाला. त्यानंतर तिघांनाही उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी मध्यरात्री नरसय्या शेट्टी आणि त्यांचा मुलगा यशवंत या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अशपाकचा मृत्यू गुरुवारी सकाळी झाला. पोलिसांनी याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. तर सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like