खळबळजनक ! आंध्र प्रदेशात गळा कापून तिघांची हत्या करून मंदिरात शिंपडले रक्त ; नरबळीचा संशय

हैदराबाद : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील एका मंदिरात ३ मृतदेह सापडले असून ही नरबळीची घटना असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुप्तधनाच्या शोधासाठी या हत्या केल्या गेल्या असाव्यात असाही संशय आहे.

यामध्ये पंडित शिवरामी रेड्डी (वय ७०) त्यांची बहिण कडपाला कमलम्मा (वय ७५) आणि सत्या लक्ष्मीअम्मा अशी या तीन महिलांची नावे आहेत. गळा कापलेल्या अवस्थेत हे मृतदेह सापडले असून त्यांचे रक्त मंदिरात शिंपडण्यात आले होते.

१५ व्या शतकातील या मंदिराच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरु होते. पंडित शिवरामी रेड्डी व इतर दोन महिला रविवारी रात्री मंदिरात झोपल्या होत्या. पहाटेच्या सुमारास मंदिरात आलेल्या भक्तांनी मृतदेह पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्याने ही घटना गावकरी व पोलिसांना दिली.

गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांनी या तीनही महिलांचे गळे कापून हत्या केली. त्यानंतर त्यांचे रक्त मंदिरात शिंपडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अजून कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. गुन्हेगारांनी जाणूनबुजून पोलिसांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी तर हे कृत्य केले नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like