माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन, देशभरातून  पाच जण अटकेत 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी आज पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून सर्च आॅपरेशन सुरु केले आहे. पोलिसांनी हैद्राबाद येथून  कवी वारावर राव, फरिदाबाद येथून सुधा भारद्वाज आणि दिल्ली येथून गौतम नवलाखा या तिघांना अटक केली आहे. तर वारावर गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा या दोघांच्या घराची झडती घेण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस सह आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b280d792-aab9-11e8-975e-2dfb68b0092c’]

हैद्राबाद येथून कवी राव यांना अटक

हैद्राबाद येथून  कवी वारावर राव यांना पुणे पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर मानवी हक्क समर्थकांनी राव यांच्या घरासमोर येऊन या कारवाईला विरोध केला. राव हे माओवादी समर्थक विचारवंत समजले जातात. आंध्रप्रदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या आधीही त्यांच्यावर माओवादी समर्थक असल्याचे अनेकदा आरोप झाले होते आणि प्रचंड टीकाही झाली होती. अनेक प्रकरणात त्यांनी माओवादी आणि सरकार दरम्यान मध्यस्तीही केली होती. राव यांना नामपल्लीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पुण्याला आणण्यात येणार आहे.

दरम्यान , पुणे पोलिसांकडून  प्रसिद्ध कवी वारावर राव यांना हैदराबादमधून अटक केली आहे. ठाण्यात अरुण फरेरा आणि मुंबईत व्हर्नोन गोन्साल्वीस यांच्या घरांची झाडाझडती घेऊन त्यांनाही अटक करण्यात आली आहे. सुधा भारद्वाज यांच्या रांचीमधून तर दिल्लीमध्ये गौतम नवलखा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा मोठा अनर्थ टाळला

पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.  या प्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, अ‍ॅड सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती. एल्गार परिषदेला त्यांच्यामार्फत पैसा पुरविला गेला होता तसेच राजीव गांधीप्रमाणे एखाद्या मोठ्या नेत्याची हत्या करण्याबाबत त्यांच्यात ई मेलद्वारे माहिती दिली जात होती.

त्यांच्याकडे सापडलेल्या सुमारे २०० ई मेलमध्ये या पाच जणांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून आले. वारावर राव हे तेलंगणामधील नक्षलवाद्यांना सहानभुती असलेले प्रसिद्ध कवी आणि पत्रकार म्हणून ओळखले जातात.

पोलिसांनी  ई मेलची तपासणी करुन पोलिसांनी हैदराबाद, मुंबई, दिल्ली तसेच छत्तीसगडमध्ये या माओवादीचे थिंक टॅक असलेल्यांची माहिती घेतली. ते त्यांच्या घरी असल्याची माहिती झाल्यानंतर आज पहाटे एकाच वेळी किमान पाच ठिकाणी छापे मारुन झडती घेण्याचे काम सुरु आहे.

नालासोपारा स्फोटकप्रकरणात घाटकोपरमधून आणखी एक अटकेत

माओवाद्यांशी संबंध असल्याने व एल्गार परिषदेशी संबंधित असलेल्यांना यापूर्वी अटक केली असली तरी आता ज्यांच्या घराची झडती घेतली जात आहे, त्यांची एल्गार परिषद अथवा कोरेगाव भीमा दंगलीशी संबंध नसून ते बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंधित असल्याचे उघड झाल्याने त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

कमकुवत पोलिसांना पुणे शहर, ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दमबाजी

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे असून ते स्वत: हैदराबाद येथे गेल्याचे समजले होते. त्यानंतर हैद्राबाद येथून कवी राव यांना अटक केली आहे.

‘त्या’ स्फोटकांचा वापर संविधान रक्षकांविरोधात : कन्हैया कुमार

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे दाखल