गोरेगावात दुमजली घर कोसळून ३ ठार, ७ जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरमध्ये बांधकाम सुरू असलेलं दुमजली घर कोसळून तीन ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. गोरेगावात ही दुमजली इमारत कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे.

गोरेगावातल्या म्हाडा वसाहतीत सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. 22 वर्षीय बांधकाम मजूर श्रवण कुमारचा मृत्यू झाला आहे, तर इतर सात जण जखमी आहेत. जखमींना तात्काळ सिद्धार्थ रुग्णालयात हलवण्यात आले.

मंगल बनसा(35 वर्षं), मुन्ना शेख(30 वर्षं), शिनू (35 वर्षं), हरी वडार (3 वर्षं), शंकर पटेल(21 वर्षं), सरोजा वडार(24 वर्षं), रमेश निशाद (32 वर्षं) जखमींची नावे आहेत. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.