वाहतूक पोलिसांना मारहाण, तिघांना अटक

वाकड : पोलीसनामा ऑनलाईन – वाहतूक नियमन करताना पोलिसांनी मोटार थांबविल्याच्या रागातून तिघांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी तिघांवर सरकारी कामात अडथळा आलणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करम्यात आले आहे. हा प्रकार बुधवारी रात्री थेरगाव येथील १६ नंबर जवळ घडला.

सागर बापूराव झांबरे (वय २१) चेतन ज्ञानदेव पळसकर (वय ३०, रा. दोघेही नखाते वस्ती, रहाटणी), रविंद्र सरदेशमुख (वय २९, रा. चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई जावेद मुजावर यांनी फिर्याद दिली आहे.
जावेद मुजावर यांच्यासह सुरज सुतार, मयूर जाधव विशाल ओव्हाळ हे वाकड ठाण्याकडून काळेवाडी फाट्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, १६ नंबर येथील फ्लोरियन्स सोसायटी चौकात वाहतूककोंडी झाल्याने मुजावर आणि सुरज सुतार हे वाहतूक नियमन करण्यासाठी थांबले. त्यावेळी आरोपी एका मोटारीतून तिथून जात होते.

दरम्यान, वाहतूककोंडी असल्याने मुजावर यांनी त्यांची मोटार थांबविली. त्याचा राग आल्याने तू आमची गाडी का अडविली असे म्हणत दमदाटी व शिवीगाळ करत तिघा आरोपींनी त्यांना मारहाण केली.

ह्या हि बातम्या वाचा

चोरट्यांचे धाडस वाढले, शिवाजीनगरमध्ये स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न

अफगाणिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ला

नारळ पाणी करते शरीराला रिचार्ज

तृतीयपंथी समाजाच्या नेत्या प्रिया पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

फेसबुकवरील जाहिरातींवर भाजपने केला करोडोंचा खर्च