मुंबईमध्ये दोन कोटी रूपयांच्या चरससोबत 2 महिलांसह 3 अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या कुर्ला एलटीटी रेल्वे टर्मिनसवरून रविवारी दोन कोटी रूपयांच्या चरससोबत दोन महिला आणि एका पुरूषाला अटक करण्यात आली. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) च्या एका अधिकार्‍यांने ही माहिती देताना सांगितले की, आफताब शेख, सबीर सैय्यद आणि शमीम कुरैशी या तीन आरोपींना मिळालेल्या एका गुप्त माहितीनंतर पकडण्यात आले. या आरोपींकडून 6.628 किलोग्रॅम काश्मीरी चरस जप्त करण्यात आले.

त्यांनी सांगितले की, तिघेही जण कुर्ला ईस्टचे राहणारे आहेत. जप्त केलेला मादक पदार्थ काश्मीरी चरस आहे. मुंबई एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, तिनही आरोपींवर अशा प्रकारच्या इतर गुन्ह्यांत सहभागी असल्याचा संशय आहे. त्यांनी सांगितले की, आरोपींना सोमवारी न्यायालयात सादर केले.

रविवारी महाराष्ट्रची राजधानी मुंबईत नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) आणि आरपीएफने मोठी कारवाई करत चरससह दोन लोकांना अटक केली होती.

चरससोबत पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी दिल्लीच्या निजामुद्दीनहून मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनससाठी प्रवास करत होते आणि तपासणी दरम्यान संशयित पदार्थ मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.