दोन युवकांसह महिलेने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – औरंगाबादमध्ये काल तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ महिला आणि २ तरुणांचा समावेश आहे. औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीच्या हद्दीतील दोन युवकांनी आणि एका महिलेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
पहिल्या घटनेत उत्तमसिंग मुन्नासिंग याने एका कंपनीतील पत्र्याच्या शेडला गळफास घेत आत्महत्या केली. तो मूळचा बिहार येथील असून सध्या येथील एका कंपनीत काम करत होता.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी धाव घेत त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दुसऱ्या घटनेत तिसगाव शिवारात तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अरुणा सोमनाथ ढवळे असे आत्महत्या केलेल्या २० वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती आपल्या पती व मुलांसह राहत होती. पती पत्नीच्या किरकोळ भांडणातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या पतीने सांगितले. तिने घराच्या पत्र्याला फाशी घेत आत्महत्या केली.

तर तिसऱ्या घटनेत पंढरपूर येथील संजय रमेश शिंदे या ३७ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुलेनगर भागात ते भाड्याने राहत होते. गुरुवारी रात्री हि घटना घडली. शुक्रवारी त्यांची मुलगी शाळेत जाताना कपडे आणि दप्तर आणण्यासाठी घरी गेली असता ही घटना उघडकीस आली. गुरुवारी रात्री त्यांची पत्नी आपल्या मुलांसह शेजारी राहणाऱ्या आई वडिलांकडे झोपण्यासाठी गेली असताना त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like