‘त्या’ २ पोलीस निरीक्षकांसह महिला पोलिसावर खटला चालविण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याशीच तिला विवाह करण्याची जबरदस्ती केल्याप्रकरणी ३ पोलीसांवर खटला चालविण्याचे आदेश मुंबईच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक विवेक शेंडे, महिला हवालदार एम. ए. भोसले अशी त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकऱणी पिडीत मुलीच्या वडीलांनी न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने मंजूर केला. तिघांनाही न्यायालायने समन्स बजावले असून तिघांवरही बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सोअंतर्गत खटला चालविण्यात येईल. असे न्यायालयाने सांगितले.

असा आहे प्रकार
२०१२ पासून आऱोपींनी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिने कोणाकडेही तक्रार केली नाही. परंतु तिच्या वडीलांना आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २०१३ मध्ये ती गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर तिच्या वडीलांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आरोपींना ओळख परेडसाठी आणल्यानंतर तिने त्यांना ओळखले. मात्र त्यातील एका आरोपीशी विवाह करण्यासाठी पोलीस आणि शिवसेनेचे नगरसेवक चंगेज मुल्तानी यांनी तिच्यावर दबाव आणला. तसेच तिच्यावर जबरदस्ती केली. असे तिच्या वकिलांनी न्यायालयात अर्जाद्वारे सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like