home page top 1

पोलीस उपनिरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – ट्रक चालकासह दोघांना मारहाण करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बुलढाणा पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या अमडापुर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी आज (रविवार) त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

पोलीस उप निरीक्षक प्रकाश पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल सतिष नागरे, निलेश वाकडे असे तडकाफडकी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी एका ट्रक चालकासह दोघांना बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पोलीस उपनिरीक्षक पवार यांना पोलीस कॉन्स्टेबल नागरे आणि वकडे हे साथ देत असल्याचे दिसून येत आहे. सुरेश नंदलाल राठी (वय-६०) यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. राठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली.

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्य़मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरामुळे बुलढाणा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषय वृत्त –

Loading...
You might also like