‘त्या’ प्रकरणात ३ पोलीस तडकाफडकी निलंबित

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींसोबत मिळून मारहाण केल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे, पोलीस कॉन्सटेबल गोरख हिंमतराव पाटील अशी निलंबित करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण
खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या चिंग्या उर्फ चेतन आळंदे याला पोलिसांनी न्यायालयातून थेट कारागृहात न नेता खासगी कारने तुकारामवाडीत नेले. तेथे अरुण भिमराव गोसावी यांना मारहाण करून कारमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर चेतन आळंदे, गोलू उर्फ लखन दिलीप मराठे, हवालदार मुकेश पाटील, सुरेश सपकाळे, कॉन्सटेबल गोरख पाटील यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश याचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग होता तर सुरेश सपकाळे आणि गोरख पाटील हे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी चिंग्याला सोडून घरी निघून गेले. त्यानंतर त्यांच्यावर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर तिघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

दारुड्या पोलीस कर्मचाऱ्याला सक्तीची सेवानिवृत्ती
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका मद्यपी कर्मचार्याला सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. अशोक पटवारी असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. कर्तव्यावर असताना सतत दारू पित असल्याने त्यांना सेवानिवृत्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच
#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा
#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’

You might also like