आश्चर्यजनक ! स्विमिंग टँकच्या खाली सापडलं 3 टन सोनं, समोर आलं धक्कादायक ‘वास्तव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील बेंगळुरूमध्ये पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागली आहे. पोंजी स्कॅम करणाऱ्या मंसूर खान याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना त्याच्या घरातील स्विमिंग टँकमध्ये जवळपास ६००० नकली सोन्याची बिस्किटे आढळून आली. यामुळे तपास अधिकाऱ्यांचे देखील डोळे फिरले. त्यानंतर आता इतक्या मोठ्या प्रमाणात नकली सोने कुठून आले आणि याचा वापर कशासाठी केला जाणार होता याचा तपास आता पोलीस करत आहेत.

बेंगळुरूमधील ३० हजार नागरिकांना हजारो कोटी रुपयांना चुना लावणारा आयएमएचा संस्थापक मंसूर खान याच्या घरातुन पोलिसांनी ३०३ किलो नकली सोन्याची बिस्किटे जप्त केली आहे. घरातील स्वीमिंगपूलमधून हे सगळे सोने जप्त केले असून याप्रकरणी पोलिसांनी वसीम नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. करोडो रुपयांचा घोटाळा करणारा आणि आयएमए ज्वेलर्सचा संस्थापक मंसूर खान याला पोलिसांनी नवी दिल्ली विमानतळावर अटक केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने देखील यासंबंधित लुकआऊट नोटीस जारी केली होती.

दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांना अटक केली असून या नकली बिस्किटांचा तो कसा वापर करणार होता याचा आता पोलीस तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त