WhatsApp वर तीन रेड टिकचा काय आहे अर्थ? सरकार तुमच्यावर ठेवणार का लक्ष?, जाणून घ्या

नवी दिल्ली : व्हॉट्सअप (WhatsApp ) नवीन डिजिटल नियमांबाबत सरकारविरोधात कोर्टात गेले आहे. व्हॉट्सअपचे (WhatsApp ) म्हणणे आहे की नवीन डिजिटल नियम मान्य केले तर मेसेज ट्रेस करावे लागतील. यामुळे यूजर्सच्या गोपनियतेचे उल्लंघन होईल. यावर सरकारने सुद्धा उत्तर दिले आहे. या दरम्यान एक मेसेज वेगाने वायरल होत आहे.

व्हॉट्सअपवर वायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, आता सरकार तुमचे व्हॉट्सअप मेसेज वाचू शकते. व्हॉट्सअपवर एक फिचर आहे ज्यामुळे जर रिसिव्हरने मेसेज वाचला तर दोन ब्ल्यू टिक्स येतात. याबाबत म्हटले जात आहे की, जर सरकारने मेसेज वाचला तर तिसरी ब्ल्यू टिक सुद्ध येईल.

वेगाने वायरल होत असलेल्या या फेक मेसेजमध्ये हे सुद्धा म्हटले जात आहे की, व्हॉट्सअप मेसेज सेंड केल्यानंतर जर सरकारने तुमच्या मेसेजवर कारवाई केली तर दोन रेड टिक्स सुद्धा मेसेजच्या समोर येतील. शिवाय असाही दावा केला जात आहे की, जर तीन रेड टिक्स मेसेजवर आल्या आहेत तर याचा अर्थ प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले आहे. तुम्हाला चुकीचा मेसेज सेंड करण्यासाठी कोर्टातून नोटीस पाठवली जाईल.

हा मेसेज फेक आहे. या मेसेजच्या दाव्यात कोणतेही सत्य नाही. व्हॉट्सअपवर कोणत्याही प्रकारची रेड किंवा ब्ल्यू टिक सरकारकडून येणार नाही. व्हॉट्सअप मेसेजला कुणी थर्डपार्टी वाचू शकत नाही.

याचा अर्थ सरकारसुद्धा तुमचा मेसेज वाचू शकणार नाही. सर्व व्हॉट्सअप मेसेज एन्ड टू एन्ड इन्क्रीप्टेड असतात. अशाच प्रकारे मेसेज मागच्या वर्षीसुद्धा वायरल झाला होता. यामुळे सामान्य व्हॉट्सअप यूजर्सच्या मनात भीती बसली आहे.

यासाठी असा मेसेज पाठवणार्‍यास रिपोर्ट करण्याची आवश्यकता आहे. ज्याने फेक मेसेज पाठवला आहे त्याच्या चॅट किंवा ग्रुपला ओपन करा. यानंतर प्रोफाईल इन्फोर्मेशनमध्ये जा. येथे सर्वात खाली स्क्रोल केल्यानंतर रिपोर्ट कॉन्टॅक्ट अँड रिपोर्टचा ऑपशन दिसेल. यावर टॅप करून रिपोर्ट करा.

Also Read This : 

 

हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा होईल इंजिनियरिंगचे शिक्षण, एआयसीटीईने (AICTE) दिली परवानगी

 

कडूलिंबाचे ‘हे’ ५ उपाय करा, दूर होतील विविध आजार, जाणून घ्या

 

कोरोना व्हॅक्सीनच्या सप्लायपासून मुलांच्या लसीकरणापर्यंत, केंद्र सरकारने प्रत्येक संभ्रम केला दूर; जाणून घ्या

 

वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय

 

ED ची राज्यात मोठी कारवाई, ‘या’ कंपनीची तब्बल 166 कोटींची संपत्ती जप्त

 

 

रक्ताची कमतरता असल्यास आहारात ‘या’ 12 सुपर फूड्सचा समावेश करा, जाणून घ्या