भाचीला 2 पुतण्यांसह खोलीत बंद करून आत्यानं खिडकीतून बनवला ‘अश्लील’ व्हिडिओ, समोर आलं घृणास्पद कृत्य

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गुजरातमधील अमरेली येथे एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. नात्याने आत्या असणाऱ्या महिलेने आपल्याच भाचीसोबत घृणास्पद कृत्य केले आहे. आत्याने तिच्या भाचीचे तिच्या दोन पुतण्यांकडून शारीरिक शोषण केले. इतकेच नाही तर तिने आपल्या मोबाईलमध्ये त्यांचे अश्लील व्हिडिओही बनवले. सुमारे चार महिन्यांपासून हे चालू असल्याचे जेव्हा मुलीच्या वडिलांना समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नवीन कपडे घेण्याच्या मोहात आत्याने तिला घरी नेले

प्रकरण अमरेलीच्या सावरकुंडलाचे आहे. इथल्या गावात पीडित मुलीची आत्या तिच्या दोन पुतण्यांकडून आपल्या अल्पवयीन भाचीचे शारीरिक शोषण करत होती. त्याचा तिने एक व्हिडिओही बनविला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्या 14 वर्षीय भाचीला तिच्याकडे नवीन कपडे घेण्याच्या आमिषाने घेऊन गेली. यानंतर दोन्ही पुतण्यांना तिने घरी बोलवून घेतले आणि भाचीस त्यांच्याकडे सोपविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्याने आपली भाची आणि दोन्ही पुतण्यांना एका खोलीत पाठवले आणि बाहेरून दरवाजा बंद केला. दरवाजा बंद होताच दोन्ही पुतण्यांनी चाकूचा धाक दाखवून निर्दोष मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

खिडकीतून बनवला भाचीचा अश्लील व्हिडिओ

खोलीच्या बाहेर उभ्या असलेल्या आत्याने खिडकीतून तिच्या भाचीच्या व्हिडिओही बनविला. यानंतर तिने या व्हिडीओच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणे सुरू केले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिघांनीही मुलीचा फायदा घेण्यास सुरुवात केली. हा क्रम गेल्या चार महिन्यांपासून चालू होता. तिच्या शारीरिक शोषणाने त्रस्त झालेल्या पीडित मुलीने तिच्या वडिलांना सत्य सांगण्याची हिम्मत केली.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली

मुलीचे बोलणे ऐकून वडिलांना मोठा धक्काच बसला. त्याने तातडीने आपल्या मुलीला बहिणीच्या घरून परत आणले आणि पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणात वडिलांनी आपली बहिण आणि दोन्ही भाच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित वडिलांच्या अहवालाच्या आधारे गुन्हा नोंदविला आणि तिन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलिस पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.