खुशखबर ! पासपोर्ट काढणं झालं सोपं, पोलिस पडताळणीतून ३ नियम वगळले, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पासपोर्ट तयार करण्यासाठी किती प्रकारची कागदपत्रे लागतात हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या परवानग्या देखील घ्याव्या लागतात. मात्र आता तुम्हाला यासाठी जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. फोटो, पत्ता आणि सहीच्या पडताळणीसाठी यापुढे तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. यासाठी काही नियमांना पडताळणी फॉर्ममधून हटविण्यात आले आहे.

या फॉर्ममध्ये सुरुवातीला असणाऱ्या नऊ नियमांमधून आता तीन नियम कमी केल्याने फक्त सहा नियम उरले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला यापुढे पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. पोलिसांकडे अधिकार असलेल्या या नियमांना फॉर्ममधून हटविण्यात आले आहे. यापूढे आता या नियमांची पडताळणी पासपोर्ट कार्यालयामार्फतच करण्यात येणार आहे. मात्र संदिग्ध आणि विशेष प्रकरणांमध्ये पोलीस अर्जदाराची तपासणी आणि पडताळणी करू शकतात.

अर्जदार झाले कमी
पासपोर्ट सेवा केंद्रात पूर्वीप्रमाणे अर्जांची संख्या नाही. प्रत्येक विभागात पासपोर्ट केंद्र झाल्याने आता पूर्वी सारखी एकाच केंद्रावर गर्दी होत नाही. त्यामुळे विदर्भात १० जिल्ह्यांत हि सेवा केंद्रे सुरु झाल्यामुळे आता हळूहळू केंद्रांवरील ताण कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

पोस्ट ऑफिस केंद्रांना मिळणार लीज लाईन

विदर्भातील अनेक पोस्ट ऑफिस केंद्रांना बीएसएनएलची लीज लाईन सेवा देण्यात येणार असून यामुळे त्यांची सेवा वेगवान होण्यास मदत होणार आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने सेवा योग्यरीत्या पुरवली जात नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर अनेक वेळा काम करण्यासाठी नागपूरला यावे लागते.

त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या ब्रॉडबँड सेवांचे काम चालू असल्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करायला लागत असल्याचे पोस्टाच्या वतीने सांगण्यात येत आहे. विदर्भात अकोला, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, वर्धा, गोंदिया, भंडारा, बुलडाणा याठिकाणी पोस्ट ऑफिस आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय