शहरातील तीन शोरूम फोडले, अनेक दुकानांत चोरी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील नगर-मनमाड या महामार्गावरील मराठा सायकल सेंटर, एमआरएफ टायर, एका बॅटरी अशी शो रूम चोरट्यांनी फोडले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. तसेच पाईप लाईन रोडवर ही काही दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकाच रात्री अनेक चोऱ्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही शोरूम मधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याद्वारे तपास चालू केला आहे. एकाच रात्री तीन मोठी दुकाने व रस्त्यावरील अनेक दुकाने पडल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तोफखाना पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. एकाच रस्त्यावर तीन मोठी शोरूम फोडल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

Visit :  Policenama.com