दुर्देवी ! तलावात बुडून 2 सख्ख्या बहिणींसह तिघींचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – दुपारी साडे चारच्या सुमारास तीन मुली पाझर तलावाजवळ खेळण्यासाठी गेल्या होत्या. तीन मुलींसोबत एक लहान मुलगीही खेळायला गेली होती. खेळत असताना या तीन मुली पाझर तलावात बुडू लागल्या. सोबत असलेल्या लहान मुलीने गावात जाऊन ही घटना सांगताच आई-वडिल आणि गावकरी तलावाजवळ गेले. गावकरी आणि आई-वडील त्या ठिकाणी पोहचेपर्यंत तीन मुलींचा तलावात बुडून दुर्देवी अंत झाला होता. ही घटना त्र्यंबकेश्वर येथे घडली आहे.

मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे 
जिजा सोनू बेंडकोळी (वय-९), धनश्री बेंडकोळी (वय-७) आणि स्वप्नीली बेंडकोळी (वय-५).
मृत पावलेल्या मुली ह्या सख्ख्या बहिणी आहेत.