पिंपरी-चिंचवड मध्ये रिक्षा अपघातात तीन विद्यार्थी जखमी

पिंपरी चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन

शहरातून धावणाऱ्या मेट्रोची कामे मोठ्या जलद गतीने सुरु आहेत, मात्र या कामांमुळे वाहतुकदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज अश्याच एका घटनेत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारा एक रिक्षा महामेट्रो ने उभारलेल्या बॅरीकेट ला जाऊन धड़कला आणि मोठा अपघात टळला या घटनेत दोन ते तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’27eb6c79-aab6-11e8-845d-f1194ae69edb’]

लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता : शरद पवार 

शहरातील कासारवाड़ी परिसरात झालेल्या अपघात हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. अपघातात रिक्षातून प्रवास करणारे पाच पैकी दोन विद्यार्थी जखमी झाले असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील विद्यार्थी खड़कीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या अपघाताच्या वेळी रस्त्यावर मोठी वर्दळ होती त्यामुळे अपघातग्रस्त रिक्षाला नागरिकांनी त्वरित ऊभा करून रिक्षा खाली असलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढल आणि मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे पिंपरी शहरातील शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातुन होणारी अवैध वाहतूक आणि मेट्रोच्या कामाचा परिणाम अधोरेखित झाला आहे.

लोकसभेसाठी पुण्यात भाजपही सक्रीय संयोजकपदी दीपक मिसाळ यांची निवड