जम्मू-काश्मीर : पुलवामाच्या त्रालमध्ये ‘चकमक़’, सुरक्षा दलांकडून 3 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

श्रीनगर : वृत्त संस्था – जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी रात्री उशीरा चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केले. यावेळी बराच वेळ फायरिंग सुरू होती. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र होती, ज्याद्वारे ते लागोपाठ फायरिंग करत होते.

दहशतवादी जेथे लपले होते, त्या परिसराला सुरक्षा दलांनी घेरले. यानंतर 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. अजूनही या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू ठेवणात आले आहे. आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी 5 फेब्रुवारीला श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गाडीवर हल्ला केला होता. यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. चकमकीत जखमी झालेल्या एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला. या चकमकीत सीआरपीएफाचा एक जवानसुद्धा शहीद झाला होता. या जवानाचे नाव जीडी रमेश रंजन होते. ते बिहारच्या आरा जिल्ह्यातील रहिवाशी होते.

सीआरपीएफ-पोलीस पथकावर केला हल्ला
हा हल्ला श्रीनगरच्या पारिम पोस्टजवळ झाला. श्रीनगर बारामूला रोडवर बुधवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलीस पथकावर हल्ला केला. श्रीनगरच्या लावेपोरा परिसरात परीम पोरा चेक पोस्टवर अचानक फायरिंगचा आवाज येऊ लागला. ज्यानंतर ताबडतोब सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like