J & K : श्रीनगरमध्ये चकमकीत 3 दहशतवादी ठार

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचा कहर सुरु असताना जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सुरक्षा रक्षकांसोबत त्यांचा अनेकदा आमना-सामना होऊन चकमकीही घडत आहेत. आज सकाळी श्रीनगरमध्ये अशीच एक चकमक झाली. त्यामध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

श्रीनगरच्या बाटमालू भागात आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडोतोड प्रत्युत्तर दिले असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे. त्यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. या ठिकाणी शोध मोहिम अद्यापही सुरु आहे. परिसरात तणावपूर्ण वातावरण असल्याचेही सांगण्यात आले आहे .