जम्मू-काश्मीर : ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये झाली नियुक्तीच भरती, जवानांकडून 3 दहशतवाद्यांना अटक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे जवानांची दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर दक्षिण काश्मीर परिसरात राबवण्यात आलेल्या शोध मोहीमेत लोलाब जंगल भागातून लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात जम्मू-काश्मीर पोलीस व 28-राष्ट्रीय रायफलच्या जवानांना यश आले आहे.

पकडण्यात आलेले हे तिन्ही दहशतवादी नुकतेच लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेशी जोडल्या गेले होते. यातील दोघांची ओळख पटली असून झाकीर अहमद भट आणि आबिद हुसेन वानी अशी त्यांची नावे आहेत. याआधाी जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे 3 मे रोजी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक जण लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हैदर मारला गेला होता.

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक विजयकुमार यांच्या हवाल्याने सुमारे आठ तास सुरु असलेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले होते. मात्र, यामध्ये दोन लष्करी अधिकार्‍यांसह 5 जवान शहीद झाले होते. यात जम्मू-काश्मीर पोलिसांतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा देखील समावेश होता.