‘ठाकरे सरकार’कडून 3000 मराठा आंदोलकांना ‘दिलासा’, गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांकडून ‘शिफारस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडी या नव्या सरकाराच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विविध प्रकणांतील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात केली आहे. सरकार स्थापन झाल्याच्या दहा दिवसात पाच प्रकरणांतील गुन्हे मागे घेण्याचे निर्णय घेतले आहेत. आरे, नाणार, कोरेगाव भीमा, शेतकरी आंदोलन नंतर आता उद्धव यांनी स्थानिक न्यायालयातील मराठा आंदोलकांवर दाखल असलेले २८८ गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे तीन हजार आंदोलक युवकांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, मराठा आंदोलकांवर जवळपास ३५ गुन्हे असे आहेत जे मागे घेतले जाणार नाहीत. कारण, यामध्ये पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत तसेच विरोध करताना पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहेत, अशी माहिती एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

तरी, सरकारने या संदर्भातील गुन्हे रद्द करण्यासाठी पोलिस आयुक्तांद्वारे स्थानिक न्यायालयांना शिफारस केली आहे. यावर आता न्यायालय निर्णय घेणार आहे.

Visit : Policenama.com