फिरायला गेलेल्या महिलांवर काळाचा घाला ; ट्रकच्या धडकेत तिघींचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या तीन महिलांवर काळाने घाला घातला असून अज्ञात वाहनांच्या धडकेने त्यांचा मृत्यु झाला. ही घटना नगर कल्याण महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील उदापूर येथे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या मातोश्रींचा समावेश आहे.

मीराबाई सुदाम ढमाले (वय ६८), कमलाबाई महादू ढमाले (वय ६५), सगुणाबाई बबन गायकर (वय ६५, सर्व रा. ढमालेमळा) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत.

या महिला पहाटे मॉनिंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्या. नगर -कल्याण महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनाने या महिलांना जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन त्यातच त्यांचा मृत्यु झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला आहे.
ओतूरपासून सुमारे १५ किमी अंतरावर उदापूर हे महामार्गावरील गाव आहे. या घटनेमुळे ओतूर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओतूर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले असून त्यांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like