विषारी साप चावल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथे राहणाऱ्या एका तीन वर्षीय बालकाला सापाने दंश केल्यामुळे बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्मित प्रदीप तट्टू असे या बालकाचे नाव आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तीन वर्षाच्या स्मिताला पाहाटे लघुशंका आल्याने त्याने वडिलांना उठवले. यावेळी वडिलांनी त्याला बाथरुममध्ये जायला सांगितले. यावेळी स्मित बाथरूममध्ये गेला असता दबा धरून बसलेल्या विषारी सापाने त्याला दंश केला. त्यानंतर स्मितच्या पायाला वेदना होऊ लागल्या.

तेव्हा समितीने ‘मला काहीतरी चावले आहे, दवाखान्यात न्या माझ्या पायाला हात लावू नका असे सांगितले. त्यानंतर त्याचे वडील,काका यांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घरच्यांनी स्मितला काय चावले असेल याचा तपास केला असता बाथरूममध्ये साप निदर्शनास आला. या घटनेनंतर मात्र पारगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.