भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील भटक्या कुत्र्यांनी घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आज घडलेल्या या घटनेमुळे हाळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आज सकाळी दिलखुश प्रजापती हे तीन वर्षीय बालकाची आई आणि आजी या दोघी कामाला गेल्या होत्या. त्या धुण्याभांड्याची कामे करतात. सकाळी आठवाजेच्या दरम्यान या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. हल्ल्यात बालकाच्या डोक्याला, पायाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या. ही घटना परिसरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची परिस्थिती पाहता जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविले.

मुलाच्या अंगावर सर्वत्र कुत्रे चावले होते. त्याच्या डोक्याला सर्वाधिक चावा असून परिस्थिती चिंताजनक आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. पुण्याला उपचारासाठी नेले असताना ससून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर बालकाला मयत घोषित केले.

Loading...
You might also like